एअर इंडियाचा दुबई-दिल्ली विमानाचा कप्तान शारजाह विमानतळावर सुरक्षा कर्मचाऱ्यांना उड्डाणावेळी मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. यामुळे शेवटच्या मिनिटाला वरिष्ठ पायलटकडे विमानाची सूत्रे सोपविण्याची वेळ एअर इंडियावर आली. एअर इंडियाचे दुबई- कोची मार्गे- दिल्ली हे विमान उड्डाणासाठी तयार होते. नियमाप्रमाणे पायलटची चाचणी शारजाह विमानतळाचे सुरक्षा कर्मचारी घेत होते. या वेळी विमानाचा कप्तान मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्षात आले. त्याला तातडीने ताब्यात घेत याची माहिती विमानातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली. यामुळे ऐन वेळेला वरिष्ठ पायलटकडे सूत्रे सोपवून विमान मार्गस्थ करण्यात आले.
या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कप्तान दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले.