बेपत्ता झालेले इंडोनेशियातील विमान सुमात्राच्या सुमात्राच्या पूर्व किनारपट्टीजवळील बेलिटुंग समुद्रात कोसळले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मलेशियाचे वाहतूकमंत्री लिओ तिआँग लाइ यांनी त्याचा इन्कार केला. खराब हवामानामुळे विमान वळवण्याची परवानगी वैमानिकाने मागितली होती, असे ‘एअर एशिया’ने म्हटले आहे, तर विमानाने नेहमीपेक्षा वेगळय़ा मार्गाने जाण्याची परवानगी मागितली होती, असे इंडोनेशियाच्या वाहतूक मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. विमानाशी संपर्क तुटला, त्या भागात हवेत ५० हजार फूट उंचीपर्यंत ढग दाटलेले होते व चक्रीवादळही होते, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

उड्डाणानंतर ४२ मिनिटांत बेपत्ता
*इंडोनेशियातील सुराबया येथून स्थानिक वेळेनुसार पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी उड्डाण करणारे एअरबस ए३२०-२०० वर्गातील ‘क्यूझेड ८५०१’ हे विमान सकाळी ८.३० वाजता सिंगापूरला पोहोचणे अपेक्षित होते.
*मात्र ४२ मिनिटांनंतर, सकाळी ६.१७ वाजता विमानाचा जाकार्ता येथील हवाई नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला व ते बेपत्ता झाले.
* संपर्क तुटण्यापूर्वी वैमानिकाने हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला होता. हवामान खराब असल्याने विमान ३२ हजार फूट उंचीवरून ३८ हजार फूट उंचीवर नेण्याची परवानगी त्याने मागितली होती. मात्र ३२ हजार फूट उंचीवर असतानाच विमानाचा संपर्क तुटला.
*त्या वेळी हे विमान इंडोनेशियाच्या उड्डाण माहिती (एफआयआर) भागात होते व सिंगापूर-जाकार्ता सीमेपासून २०० नॉटिकल मैल अंतरावरील बेलिटुंग बेटावरील तांजुंग पांडन येथे त्याची शेवटची नोंद आढळली.
*या विमानात सात कर्मचारी व १५५ प्रवासी होते. त्यापैकी १४९ जण इंडोनेशियन, तीन दक्षिण कोरियन आणि ब्रिटन, मलेशिया आणि सिंगापूरच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे.dv03विमान दुर्घटना आणि लांबलेल्या शोधमोहिमा
*१ जून २००९
‘एअर फ्रान्स’चे विमान बेपत्ता, २२८ प्रवासी व कर्मचाऱ्यांना घेऊन एअर फ्रान्सचे विमान समुद्रात बेपत्ता झाले. अनेक दिवस या विमानाचा शोध सुरू होता. अखेर दोन वर्षांनी या विमानाचे अवशेष आणि फ्लाइट रेकॉर्डर सापडले.
*२२ मार्च १९५७
टोकियोपासून २०० मैल अंतरावर समुद्रात अमेरिकेचे विमान कोसळले. ६७ जण अद्याप बेपत्ता.
*१ जानेवारी १९८५
पॅराग्वेतून शिकागोला जाणारे विमान बोल्विआतील इलिनॉइज शिखरावर कोसळले. बेपत्ता झालेल्या या विमानाचा शोध तब्बल १९ वर्षांनी लागला.
*१३ ऑक्टोबर १९७२
*उरुग्वेच्या विमानाने देशाच्या रग्बी संघासह ४५ प्रवाशांना घेऊन उड्डाण केले.
अँडे पर्वतरांगेत हे विमान बेपत्ता झाले. ७२ दिवसांनंतर या विमानाचा शोध
लागला. बर्फाळ प्रदेशात मृतदेह रुतल्याने ते टिकून राहिले होते.

विमान अपघातनामा
*‘डग्लस डीसी-३’ या प्रकाराच्या विमानाचे आतापर्यंत सर्वाधिक १९ अपघात झाले.
*बम्र्युडा ट्रँगलजवळ पाच विमाने बेपत्ता झाली. त्याचे गूढ अद्याप उकलले नाही.
*सरासरी १३ प्रवासी वा कर्मचारी विमान अपघातात ठार होतात.
*दरवर्षी १-२ विमाने बेपत्ता होतात.
‘एअर एशिया’च्या लोगोत बदल
विमान बेपत्ता झाल्याने ‘एअर एशिया’ने ट्विटर व फेसबुकवर आपल्या लोगोत बदल केला. या लोगोचा लाल रंग बदलवून त्यांनी करडा (ग्रे) केला आहे. हे विमान बेपत्ता झाल्याची माहितीही ट्विटरवरून देण्यात आली आहे.