धावपट्टीवर उतरताना टेलिफोनच्या खांबास धडकल्यामुळे जगातील सर्वात मोठे विमान एअरलँडर- १० विमान कोसळले. आपली दुसरी चाचणी करून ब्रॅडफोर्डशायर येथील कार्डिंग्टन विमानतळावरील धावपट्टीवर उतरताना हा अपघात झाला. या अपघातात विमानाच्या कॉकपिटचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मागच्या आठवड्यात बुधवारी या विमानाची पहिली चाचणी यशस्वी झाली होती.
या एअरक्राफ्टची लांबी ९२ मीटर, रुंदी ४४ मीटर आणि उंची २६ मीटर आहे. विमानाच्या निर्मितीसाठी सुमारे २.५ अब्ज रुपये इतका खर्च आला आहे. हे एअरक्राफ्ट बनवण्यासाठी १० वर्षांचा कालावधी लागला आहे. हेलिअम गॅसवर हे विमान उडते. ४८ प्रवाशांना घेऊन उडू शकणाऱ्या या विमानाची १० हजार टन सामानही उचलण्याचीही क्षमता आहे. ४८ प्रवाशांना घेऊन उडू शकणाऱ्या या विमानाची १० हजार टन सामानही उचलण्याचीही क्षमता आहे. १४८ किलोमीटर वेगाने उडू शकणारे हे विमान पाण्यावरही उतरू शकते. या विमानाचे डिझाईन ब्रिटनच्या हायब्रीड एअर व्हेईकल कंपनीने बनवले आहे.