22 September 2017

News Flash

नव्या संशोधनाने आइनस्टाइनच्या गुरुत्व सिद्धांताला आव्हान

आइनस्टाइनच्या गुरुत्व सिद्धांताला आव्हान मिळाले आहे.

पीटीआय, लंडन | Updated: March 21, 2017 1:29 AM

दीर्घिकांचा समावेश असलेली महाकाय चकती प्रचंड वेगाने आपल्या पृथ्वीपासून अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने दूर जाताना दिसली असून ती लघु महाविस्फोटाप्रमाणे प्रसरण पावत असल्याची शक्यता आहे त्यामुळे आइनस्टाइनच्या गुरुत्व सिद्धांताला आव्हान मिळाले आहे. या संशोधनात एका भारतीय वैज्ञानिकाचाही समावेश आहे. ही चकती १० दशलक्ष प्रकाशवर्षे इतकी रूंद आहे व प्रसरण पावत आहे, त्याचे साधम्र्य लघु महाविस्फोटाशी दाखवता येईल. संशोधकांच्या मते आपल्या शेजारची देवयानी दीर्घिका आपल्या आकाशगंगेजवळून गेली होती त्यावेळी काही लघु दीर्घिका तयार झाल्या होत्या. जर आइनस्टाइनचा गुरुत्व सिद्धांत खरा असेल तर आपली आकाशगंगा कधीही देवयानीच्या जवळ यायला नको असे ब्रिटनच्या सेंट अँड्रय़ूज विद्यापीठाचे डॉ. होंगशेंग झाओ यांनी सांगितले. जर नवीन संशोधन खरे असेल तर आपले गुरुत्वाचे व विश्वाचे ज्ञान बदलणार आहे. दीर्घिकांचा चकतीसारखा संच ही वेगळी बाब नाही. या दीर्घिका पावसाच्या थेंबाची दोऱ्यात गुंफण करावी तशा फिरत्या छत्रीसारख्या अवकाशीय वस्तूतून फेकल्या गेल्या असे याच विद्यापीठाचे पीएचडी विद्यार्थी इंद्रनील बानिक यांनी म्हटले आहे. ते या संशोधनाचे नेतृत्व  करीत आहेत.

दीर्घिका आपण सध्या पाहतो आहोत त्या चकतीसारख्या आकारात बांधल्या जाण्याची शक्यता ६४० मध्ये १ इतकी कमी असते, विश्व आतापेक्षा निम्म्या वयाचे होते तेव्हाच्या गतीकीय घटनांच्या मुळाचा अभ्यास आपण केला आहे, असा बानिक यांचा दावा आहे. आपल्या जवळच्या देवयानी दीर्घिका आकाशगंगेवर धडकताना राहिली त्यामुळे सुनामीसारख्या वैश्विक लाटा निर्माण झाल्या. दोन जास्त वस्तुमानाच्या दीर्घिका त्यावेळी एकमेकांभोवती एका प्रतलात फिरत होत्या त्यामुळे बटू दीíघका त्यांच्या मार्गापासून ढळल्या. त्यामुळे वेगवान बटू दीíघका या आकाशगंगा व देवयानी दीर्घिका यांच्या प्रतलात आहेत. आइनस्टाइनच्या सिद्धांतानुसार कृष्णद्रव्याचे अस्तित्व आहे. या बटू दीíघका ज्या वेगाने फिरत आहेत त्यावरून त्या आकाशगंगा व देवयानीपेक्षा जास्त वस्तुमानाच्या असाव्यात पण त्यांच्यातील कृष्णद्रव्याच्या घर्षणाने त्या अपेक्षेप्रमाणे अडीच दशलक्ष प्रकाशवर्षे दूर जाण्याऐवजी एकत्र झाल्या. जर्नल मंथली नोटिसेस ऑफ रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

First Published on March 21, 2017 1:20 am

Web Title: albert einstein gravity theory
 1. S
  Sandesh Sankhe
  Mar 21, 2017 at 12:16 am
  जर विज्ञानवादी विश्वाची निर्मितीच अपघातातून झाली आहे असा दावा करणार असतील तर हा नियमांचा व संशोधनाचा फाफटपसारा हवाच कशाला.कारण ज्या विश्वाचे मूळ अपघातच असेल तर अपघाताला व त्यातून होणाऱ्या परिणामांना कसले लागणार नियम ? तेव्हा विश्व् नियमांनी चालत आहे व त्यासाठी संशोधन करायचे असेल तर तर्कशास्त्रीय दृष्ट्या हे मानावेच लागेल कि विश्वाच्या निर्मिती मागे एक विशिष्ट बुद्धी व हेतू आहे.अन्यथा निर्हेतुक व बुद्धीशून्य विश्वनिर्मितीच्या रहस्य उलगडण्याचा व्यर्थ धडपड सोडून द्या.
  Reply
  1. S
   Shreekant Shreekant
   Mar 21, 2017 at 6:40 am
   समजायला खूप कठीण आहे सगळं, परंतु जे समोर दिसत आहे, ते स्वीकार करायला काय हरकत आहे? ही सूर्यमाला, ऋतुमान, भरती-ओहोटी, आणि सामान्य जनांना ज समजतील अश्या शास्त्रीय घटना आपल्या आसपास सातत्याने घडतात, त्याचाच व्यवस्थित अभ्यास करणे अधिक सोपे आहे.
   Reply