शहरातील रस्त्याकडेला झालेल्या एका भीषण बॉम्बस्फोटात १३ जण ठार झाल्याची घटना गुरुवारी घडली. पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी हा हल्ला घडवून आणल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
अफगाणिस्तानातील परकीय सैन्य काढून घेण्याच्या निर्णयानंतर काही तासांतच तालिबान्यांनी हा स्फोट घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.
घोरच्या पश्चिम प्रांतात हा स्फोट झाला. यात सात पोलीस ठार झाले, तर अन्य एका स्फोटात ६ खाण कामगार ठार झाले. स्फोटात ठार झालेले खाण कामगार हे ब्रिटनमधील एका कंपनीसाठी काम करत होते.