अमेरिकेने भारताला प्राचीन काळातील २०० कलावस्तू परत केल्या असून, त्यांची किंमत १० कोटी डॉलर्स इतकी आहे. त्यातील काही दोन हजार वर्षांपूर्वीच्या वस्तू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर असून, या वस्तू परत करण्यासाठी ब्लेअर हाऊस येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी सांगितले, की सर्वसाधारणपणे दोन देशांतील संबंध हे वर्तमानकाळाशी निगडित असतात, पण भारत-अमेरिका यांच्यातील संबंध प्राचीन वारशाशी संबंधित आहेत. सांस्कृतिक वारसा असलेल्या वस्तू अमेरिकेने परत केल्या आहेत. या वस्तू भारतातून काहींनी चोरून त्या अमेरिकेत नेल्या होत्या. त्या परत केल्याने भारत-अमेरिका यांच्यातील संबंध एका व्यापक स्तरावर गेले आहेत. गेल्या दोन वर्षांत इतरही काही देशांनी भारतातून चोरीस गेलेल्या सांस्कृतिक वारसा असलेल्या वस्तू परत केल्या आहेत. काही वेळा प्राचीन सांस्कृतिक वारसा हा दोन देशांतील संबंधांचा महत्त्वपूर्ण बिंदू ठरतो तेच अमेरिकेच्या या कृतीतून दिसून आले आहे. दोन्ही देशांतील सरकारे व कायदा अंमलबजावणी संस्था या सांस्कृतिक वारसा असलेल्या वस्तूंच्या चोरीबाबत अधिक सतर्क झाल्या आहेत. या वस्तूंची चोरी रोखण्याबरोबरच त्या एकमेकांना परत करण्यावरही दोन्ही देशांनी भर दिला आहे.

हा सांस्कृतिक ठेवा परत केल्याबद्दल मी अध्यक्ष ओबामा यांचा आभारी आहे, असे सांगून ते म्हणाले, की या कलावस्तूंची किंमत पैशात केली तर ती लाखो रुपये असेलही, पण भारताची संस्कृती व वारसा यासाठी त्याचे मोल त्याहून फारच मोठे आहे. पर्यटकांना केवळ आधुनिक ठिकाणे बघायची नसतात तर त्यांना ते जेथे जातात तेथील ऐतिहासिक ठिकाणे बघायची असतात. प्राचीन संस्कृतीमुळे लोक भारताकडे आकर्षित होतात. पाच हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीतील ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटक भारतात येत आहेत. अमेरिकेने सोमवारी १२ कलावस्तू राजदूत अरुण के. सिंग यांच्या स्वाधीन केल्या. त्यात टेराकोटा, कांस्य पुतळे यांसारख्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या वस्तूंचा समावेश आहे. प्राचीन धार्मिक ठिकाणाहून त्या चोरून अमेरिकेत नेण्यात आल्या होत्या. चोला दरबारातील संतकवी मनिकाविचावकर यांची मूर्ती चेन्नईतील सिवन मंदिरातून चोरीला गेली होती, त्याचा या वस्तूंत समावेश असून, या मूर्तीची किंमत १५ लाख डॉलर्स आहे. हिंदू देवता गणेशाची कांस्य मूर्तीही यात असून ती एक हजार वर्षांपूर्वीची आहे.

firearms seized in thane marathi news, illegal firearms marathi news
निवडणुकांपूर्वी मध्य प्रदेशात तयार होणारे अवैध अग्निशस्त्र ठाण्यात ?
promote electric vehicles in India
भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन प्रस्ताव, कोणता ठरणार फायदेशीर?
startup company, tax relief, money mantra, finance,
Money Mantra : स्टार्टअप कंपन्यांना कसा मिळणार कर दिलासा?
AI killing tech jobs
AI मुळे नोकऱ्या जाणार की वाढणार? आयबीएम इंडियाचे प्रमुख काय म्हणतात नक्की वाचा!