पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी टीका केली आहे. “ममता बॅनर्जी यांना ‘भाजप-फोबिया’ झाला आहे. त्यामुळे त्या भाजपवर सारख्या टीका करत आहेत” असं ते म्हणाले. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

पश्चिम बंगालचा विकास, तिथला हिंसाचार आणि बांगलादेशमधून होणारी घुसखोरी या मुद्द्यांवर अमित शहा यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींवर कडाडून टीका केली. बांगलादेश आणि भारतातला सीमावाद संपूर्णपणे मिटला असून तशा करारांवर दोन्ही देशांच्या सह्यासुध्दा झाल्या आहेत. पण त्यानंतरही बांगलादेशींची घुसखोरी सुरूच असल्याचं अमित शहांनी म्हटलं. त्यांनी यासाठी पश्चिम बंगाल सरकारला जबाबदार धरलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या हिंसाचारासाठीही त्यांनी ममता बॅनर्जींना जबाबदार धरलं आहे. हा हिंसाचार राजकीय विचारांनी प्रेरित असल्याचा आरोप त्यांनी करत त्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालला जबाबदार ठरवलं.

बांगलादेशी घुसखोरांच्या प्रश्नाविषयी बोलत असताना त्यांनी हे घुसखोर बनावट नोटांची तस्करी करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. यामुळे मोदी सरकारच्या नोटांबदीच्या मोहिमेमध्ये अडसर निर्माण होत असल्याच त्यांचा रोख होता.

पश्चिम बंगाल राज्य सरकारवर टीका करत असताना त्यांनी काही आकडेवारीही दिली. स्वातंत्र्य मिळाल्यावर बंगालचा देशाच्या विकासातला वाटा २५ टक्के होता पण आतात तोच ४ टक्के झाला असल्याचं सांगत पश्चिम बंगालच्या दुरावस्थेला ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या तृणमूल काँग्रेसचं राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप अमित शहांनी केला. केंद्रात भाजपचं सरकार असताना प. बंगालमध्येही भाजपचं सरकार आलं तरच प.बंगालचा विकास होईल असाच एकूण त्यांच्या बोलण्याचा रोख होता.