भारतीय जनता पक्षाचे(भाजप) नवनिर्वाचित अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधातील चकमकींप्रकरणी न्यायालयात त्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ उदय ललित यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
याआधी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून चार ज्येष्ठ न्यायाधीशांची नावे सुचविण्यात आली होती. त्यातील तीन नावांना मोदी सरकारने संमती दर्शविली होती व गोपाल सुब्रमण्यम यांच्या नावाचा फेरविचार करण्याची सूचना केंद्र केली होती. यामुळे संतापलेल्या सुब्रमण्यम यांनी स्वत:च आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने त्यांच्या जागी आता उदय ललित यांची शिफारस केंद्राकडे केली आहे.