महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरुद्धचा २००१-०२ मधील प्राप्तीबाबतचा करविषयक खटला पुन्हा सुरू करण्याची अनुमती बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने प्राप्तिकर विभागाला दिल्याने बच्चन यांना दणका बसला आहे.
अमिताभ बच्चन यांच्यावरील करदायित्वाचे नव्याने निर्धारण करण्याचे मुंबईच्या प्राप्तिकर आयुक्तांनी दिलेले दोन आदेश न्या. रंजन गोगोई आणि न्या.पी. सी. पंत यांच्या पीठाने योग्य असल्याचा निर्वाळा दिला.
प्राप्तिकर विभागाने सादर केलेल्या दोन स्वतंत्र याचिकांना सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली आणि मुंबई उच्च न्यायालय आणि प्राप्तिकर अपीलीय लवादाचे आदेश रद्द केले.