गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने उन्हाचा पारा वाढत आहे, त्याचप्रमाणात देशातील आइस्क्रीम उद्योगातील दोन दिग्गज कंपन्यांमधील वादही टोकाला पोहोचल्याचे दिसत आहे. क्वॉलिटी आइस्क्रीमची निर्माता कंपनी हिंदुस्तान लिव्हर (एचयूएल) ही बहुराष्ट्रीय कंपनी आणि गुजरात को-ऑपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशनच्या (जीसीएमएमएफ) अमूल ब्रँड यांच्यातील वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. अमूलने आपल्या जाहिरातीत आइस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्टचा फरक दाखवताना ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप हिंदुस्तान लिव्हरने केला आहे. अमूलने जाहिरातीत आपल्या आइस्क्रीममध्ये दुधाचा वापर केला जातो तर इतर कंपन्यांचे फ्रोजन डेझर्ट हे व्हेजिटेबल ऑइलपासून बनवल्याचे म्हटले आहे. अमूलच्या या जाहिरातीवर हिंदुस्तान लिव्हरने आक्षेप नोंदवला आहे.

हिंदुस्तान लिव्हरच्या समर्थनात कोलकाताची नॅचरल आइस्क्रीम कंपनीही उतरली आहे. तर दुसरीकडे अमूललाही समर्थन मिळताना दिसत आहे. हॅवमॉर आणि मदर डेअरीने अमूलला पाठिंबा दिला असून त्यांनी अमूल बरोबर या प्रकरणात प्रतिवादी बनण्यास होकार दिला आहे, अशी माहिती जीसीएमएमएफचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस.सोधी यांनी दिली. त्याचबरोबर न्यायालयानेही हिंदुस्तान लिव्हरला दिलासा दिलेला नाही. अमूल आइस्क्रीम विरूद्ध फ्रोझन डेझर्टची जाहिरात मोहिम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल
Candidates Chess Tournament Alireza Firuza defeats D Gukesh sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: फिरुझाकडून गुकेश पराभूत
What is the Click here trend
X वरचा Click here ट्रेंड काय आहे? त्यावर टीका कशासाठी?
Sunil Narine's 500th T20 Match
RCB vs KKR : सुनील नरेनने आरसीबीविरुद्ध रचला इतिहास, टी-२०मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील चौथा खेळाडू

आम्ही १०० टक्के दुधापासून आइस्क्रीम बनवतो. त्यामुळे अमूलच्या कायदेशीर लढ्यास आमचा पाठिंबा राहिल, असे हॅवमॉर आइस्क्रीमचे व्यवस्थापकीय संचालक अंकित छोना यांनी म्हटले. सुरूवातीपासूनच आम्ही दुधापासून आइस्क्रीम बनवण्यास प्राधान्य दिले. आम्ही कधीच फ्रोझन डेझर्ट बनवलेले नाही. देशातील ९२ ते ९३ टक्के लोकांना फ्रोझन डेझर्ट आणि आइस्क्रीम मधील फरक माहित नसल्याचे आम्ही केलेल्या सर्व्हेत आढळून आले. ग्राहकांना आपण काय खातो हे माहीत झाले पाहिजे, असं आमचं मत असल्याचेही छोना यांनी सांगितले. अमूलने जाहिरातीत जे दाखवले ते आइस्क्रीम उद्योगासाठी गरजेचे होते, असेही ते म्हणाले.

अमूलने ही जाहिरात त्वरीत बंद करावी अशी मागणी हिंदुस्तान लिव्हरने मुंबई उच्च न्यायालयाला केली होती. सध्या तरी न्यायालयाने हिंदुस्तान लिव्हरला दिलासा दिला नसला तरी येत्या ५ एप्रिलला या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

जाहिरातीत आम्ही क्वॉलिटी वॉल्स इतकंच काय इतर कोणत्याही कंपनीचे नाव घेतले नसल्याचे अमूलने म्हटले आहे. उलट ही जाहिरात आमच्या ब्रँडचा यूएसपी असल्याचे अमूलकडून सांगण्यात आले. ग्राहकाने आइस्क्रीम घेताना पॅकवरील आइस्क्रीम हा शब्द दिसतो की नाही हे न विसरता पाहावे हाच संदेश आम्ही जाहिरातीतून दिल्याचे अमूलचे म्हणणे आहे. अन्न सुरक्षा मानक अधिनियमानुसार आइस्क्रीम हे डेअरी उत्पादनापासून बनवणे बंधनकारक आहे.