छत्तीसगडमधील अनंतगड मतदारंसघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. भाजपच्या भोजराज नाग यांनी एपीआय पक्षाच्या रुपेंदर पुडो यांचा सुमारे ५२ हजार मतांनी पराभव केला.
अनंतगड मतदारसंघातील भाजप आमदार विक्रम उसेडी हे लोकसभेवर निवडून गेल्यामुळे ही जागा रिक्त झाल्यामुळे या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती.१३ सप्टेंबरला तीन लोकसभा आणि ३३ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान झाले, त्यात अंतागडचाही समावेश होता. परंतु, नक्षलग्रस्त अंतागडचा निकाल इतर निकालांसोबत १६ तारखेला न लागल्यामुळे तो आज जाहीर करण्यात आला.