भारतात गुंतवणुकीला मर्यादाच नाही, आमची आर्थिक वाढ शाश्वत असून अजून बराच पल्ला गाठायचा आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.

सीसीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, की आमच्या देशाची आर्थिक वाढ शाश्वत आहे पण अजून बरेच अंतर कापायचे बाकी आहे. पायाभूत क्षेत्र, नागरीकरण, गृहनिर्माण, ऊर्जा, पाणी व सामाजिक क्षेत्र यात अजून गुंतवणुकीसाठी बराच वाव आहे. आज तरी भारतात गुंतवणुकीला बराच वाव आहे, आम्हाला गुंतवणूक हवी आहे, आताच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातून अर्थपुरवठाही होतो आहे. थोडय़ाच काळात अर्थव्यवस्था वेग घेईल. खासगी क्षेत्राचा त्यात मोठा हातभार असेल. मान्सूनचा पाऊस चांगला नसतानाही गेली दोन वर्षे चांगली आर्थिक वाढ राखली, या वर्षी मान्सून सुरळीत होईल असा अंदाज आहे.