केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पुढील तपासणीसाठी त्यांना पुन्हा नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात करण्यात आले असून रुग्णालयातील ‘कार्डिओथोरॅसिस अँड न्यूरोसायन्सेस’ विभागातील एक विशेष कक्षात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
जेटली यांच्यावर गेल्या २ सप्टेंबर रोजी मधुमेहाशी संबंधित एक महत्त्वाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले होते. ते नेहमीचे कामही करू लागले होते. आता शस्त्रक्रियेनंतरच्या तपासणीसाठी त्यांना ‘मॅक्स सुपरस्पेश्ॉल्टिी’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल त्यांना तेथून एम्समध्ये हलवण्यात आले.
सध्या त्यांच्यावर एम्सच्या ‘कार्डिओथोरॅसिस अँड न्यूरोसायन्सेस’ केंद्रातील एका दालनात स्वतंत्रपणे ठेवण्यात आले आहे. येत्या बुधवारी त्यांना रुग्णालयातून घरी जाऊ देण्यात येईल. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली.