युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा धक्कादायक निर्णय ब्रेग्झिटमध्ये घेतला गेल्यानंतर आता १० लाख लोकांनी स्वाक्षरीसह एक याचिका काढली असून त्यात ब्रेग्झिटचे जनमत दुसऱ्यांदा घेण्याचे आवाहन केले आहे. याचिकेवर आता ब्रिटिश संसदेत चर्चा होणार असून त्यावर १० लाखांहून अधिक सह्य़ा आहेत. आता त्यावर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडावे की नाही यावर जनमत घेतले होते त्यात बाहेर पडण्याच्या बाजूने ५२ टक्के व विरोधात ४८ टक्के मते पडली होती. गुरुवारी झालेल्या या जनमतात ७२ टक्के मतदान झाले होते. लंडनच्या जास्त मतदारांनी महासंघात राहण्यासाठी मतदान केले होते. आता काढण्यात आलेल्या याचिकेवर लंडन, ब्रायटन, ऑक्सफर्ड, मँचेस्टर येथील लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. विल्यम ऑलिव्हर हिली यांनी ही याचिका काढली असून त्यात म्हटले आहे की, ७५ टक्क्यांपेक्षा कमी मतदानात जर ६० टक्के मते बाजूने किंवा विरुद्ध पडली तरच तसा निर्णय घेण्यात यावा असा नियम करावा. संसदेच्या याचिका संकेतस्थळावर टाकलेली ही याचिका पाहण्याचा अनेकांनी प्रयत्न केला त्यामुळे संकेतस्थळच बंद पडले. अनेक लोकांनी पुन्हा जनमत घेण्यास पाठिंबा दिला आहे. याचिकेत मागणी केलेला नियम अमलात येणार की नाही हे अजून स्पष्ट नाही. स्कॉटिश स्वातंत्र्यावरील जनमताच्यावेळी हरलेल्या ४५ टक्के मतदारांनी अशाच प्रकारची याचिका करण्याचा प्रयत्न केला होता. स्कॉटलंडमध्ये प्रथम मंत्री निकोला स्टुरगिऑन यांनी सांगितले की, त्यावेळचे मतदान व आताची परिस्थिती यात फरक पडला असून स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याबाबत परत जनमत घेण्यात यावे. लंडनचे महापौर सादिक खान यांनी लंडनचे स्वातंत्र्य जाहीर करावे किंवा राजधानी हाच स्वतंत्र देश जाहीर करावा अशी मागणी करणारी याचिकाही काही लोकांनी केली आहे. लंडन हे जगातील मोठे शहर आहे त्यामुळे ते युरोपमध्ये राहिले पाहिजे असे याचिकाकर्ते जेम्स ओमॅली यांनी म्हटले आहे. एकूण ६० टक्के लंडनकरांनी युरोपीय महासंघात राहण्याच्या बाजूने कौल दिला होता.

 

illegal quarry operator in panvel
पनवेलमध्ये बेकायदा दगडखाण चालविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
nashik crime news, nashik frau marathi news
नाशिकमध्ये कर्जदारांची मालमत्ता ताब्यात घेत फसवणूक, दोन सावकारांविरोधात गुन्हा; छाप्यात करारनामे, कोरे मुद्रांक, धनादेश जप्त
loksatta analysis 30 Indians promised high paying jobs in thailand duped into scams in laos
विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?