काँग्रेसच्या आमदारावर हल्ला केल्याप्रकरणी सोमवारी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांना अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
ओवेसी यांनी सोमवारी पोलीस उपायुक्त (दक्षिण परिमंडळ) व्ही. सत्यानारायण यांच्यासमोर शरणागती पत्करली. त्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी करून अटक केली आणि वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना सरकारी रुग्णालयात नेले.
त्यानंतर ओवेसी यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. प्रत्येकी पाच हजार रुपयांचे दोन हमी सादर केल्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला.
काँग्रेसचे विधान परिषद सदस्य शब्बीर अली आणि अन्य कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याप्रकरणी ओवेसी यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता.