मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- द्रुतगती महामार्गावर अपघातात महाबळेश्वरच्या चौघांचा मृत्यू
- कोल्हापूरची टोल आकारणी कृती समितीच्या चर्चेनंतर- हर्षवर्धन पाटील
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- फेरतपासणीची लांबलचक प्रक्रिया टाळण्यासाठी डीन समितीच्या सूचना
- व्यावसायीकरणामुळे माध्यमे वास्तवापासून दूर -पी. साईनाथ
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
नवी दिल्ली - आयुष्यातील ४५ वर्षे मी दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजातील लोकांच्या कल्याणासाठी खर्ची घातली आहेत. यानंतर माझ्यावर अट्रॉसिटीच्या गुन्हा दाखल झाला आणि तो न्यायालयात सिद्ध झाला, तर मी जेलमध्ये जायला तयार आहे, अशी स्पष्ट भूमिका लेखक आशिष नंदी यांनी व्यक्त केली आहे. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये नंदी यांनी केलेले एक वक्तव्य वादग्रस्त ठरले होते.
राजस्थान पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यास तुम्ही काय करणार, असे विचारल्यावर नंदी म्हणाले, अट्रॉसिटीनुसार अजामीनपात्र गुन्हा दाखल होतो. जर वयाच्या ७५व्या वर्षी माझ्यावर संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयात तो सिद्ध झाला, तर मी जेलमध्ये जायला तयार आहे. दलित आणि आदिवासी समाजासाठी मी ४५ वर्षे काम केले असल्यामुळे त्या वक्तव्यावरून होणारा अपमान मी कदापि सहन करणार नाही.
दरम्यान, अद्याप मला कोणतेही समन्स मिळालेले नसल्याचा खुलासा त्यांनी केला.
माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल झाले असल्याची माहिती मला समजली आहे. त्यासंदर्भात मला समन्स मिळाल्यावर मी पुढील उत्तर देईन, असे त्यांनी स्पष्ट केले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















