जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील बनिहाल येथे सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) छावणीवर दहशतवादी हल्ला झाला आहे. ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार एसएसबीच्या १४ व्या बटालियनच्या एका पथकावर हा हल्ला झाला. या पथकाकडे बनिहाल येथील भुयारी मार्गाच्या संरक्षणाची जबाबदारी होती. या हल्ल्यात एक कॉन्स्टेबल शहीद झाला असून एक जण जखमी आहे. सविस्तर वृत्त अद्याप आलेले नाही.