बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेला वीस वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेमध्ये गोंधळ झाल्यानंतर आज (गुरूवार) सकाळी लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले.
अयोध्येमध्ये बाबरी मशिद पाडल्याला घटनेला २० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज विविध राजकीय पक्षांच्या खासदरांनी सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.
सकाळी कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर अध्यक्षा मीरा कुमार यांनी सभागृहात पाकिस्तान च्या संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य विशिष्ठ गॅलरीमध्ये उपस्थित असल्याची माहिती दिली.
यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरूवात करताच बसपा च्या शफीकुर्ररहमान बर्क यांनी अयोध्येत पाडल्या गेलेल्या बाबरी मसजिदीचा मुद्दा उचलून काळा झेंडा फडकवायला सुरूवात केली. त्याच्याबरोबर एआईएमआईएम चे असादुद्दीन ओवैसी यांनीसुध्दा हा विषय उचलून धरला आणि यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
भाजप आणि शिवसेना सदस्यसुध्दा बाबरी मसजिद स्थळावर राम मंदिराच्या बांधणीसाठी आणि काळा झेंडा दाखवल्यामुळे बर्क यांना निलंबित करण्याची मागणी करताना दिसले.