शनिशिगणापूर येथील शनीच्या चौथऱ्यावर दर्शनासाठी महिलांना प्रवेश दिला पाहिजे, असे स्पष्ट मत काँग्रेसच ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी आज लोणीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. लग्न झाल्यानंतर मी स्वत: पत्नीसमवेत शनिदेवाचे दर्शन घेतले होते, असेही त्यांनी सांगितले.
विखे म्हणाले, शनिशिंगणापूर येथील शनिच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेशबंदी आहे. ही परंपरा स्थानिक ग्रामस्थांनी पाळली असून, शनिच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश द्यावा अशी मागणी काही महिला संघटनांनी केली आहे. या वादाच्या पाश्र्वभूमीवर विखे म्हणाले, महिलांना मंदिरात प्रवेश देण्याच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे. महिलेला एकीकडे माता समजले जाते, दुसरीकडे देवाच्या दर्शनासाठी मात्र मज्जाव केला जातो. त्यांना दर्शनापासून रोखले जाते. महिला ही माता व अर्धागिनी आहे. महिलेच्या पोटी जन्म घेऊनही महिलांमुळे देव बाटत असेल तर ही निव्वळ अंधश्रद्धा आहे.