पंतप्रधानांच्या नावे धमकी देणारे संदेश असलेले दोन फुगे गेल्या वर्षी दहशतवादी हल्ला झालेल्या दिनानगरजवळील घेसाल खेडय़ात आढळून आले आहेत.

पिवळ्या रंगाच्या या फुग्यांवर उर्दूमध्ये लिहिलेल्या या संदेशांमध्ये ‘मोदीजी, अयुबी की तलवारे अभी हमारे पास हैं. इस्लाम जिंदाबाद’, असा मजकूर होता. एका खेडुताला शुक्रवारी त्याच्या घराजवळ पडलेले हे फुगे दिसले आणि त्यावर उर्दूमध्ये संदेश असलेला पाहून त्याने ते पोलिसांच्या ताब्यात दिले.

योगायोगाने, पाकिस्तानकडून हल्ल्याची भीती लक्षात घेऊन पंजाबच्या सीमाभागातून स्थलांतरित करण्यात आलेल्या लोकांसाठीच्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हे शनिवारी गुरुदासपूर व पठाणकोट या सीमेवरील जिल्ह्य़ांचा दौरा करणार होते.गेल्या जुलै महिन्यात दिनानगरच्या झंडे चाक खेडय़ानजीक पोलिसांनी एक फुगा जप्त केला होता. त्यावर ‘आय लव्ह पाकिस्तान’ अशी अक्षरे असलेल्या पाकिस्तानी झेंडय़ाचे चित्र होते.