बराक ओबामा, स्टिवन स्पिलबर्ग, वॉरेन बफे, मॅट ग्रोनिंग, जॉन केरी यांना आज कोण ओळखत नाही. ही नावे अशा व्यक्तींची आहेत ज्यांच्या यशाला सारी दुनिया सलाम करते. परंतु, यातील कोणत्याही व्यक्तीस त्याच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याचे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. चला जाणून घेऊ अशाच काही व्यक्तींची कहाणी…

01-tom-hanks-759-200x129
सुपरहीट हॉलिवूडपट ‘स्प्लॅश’सह अनेक चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयासाठी प्रसिध्द असलेले अभिनेता टॉम हँक्स यांनी मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) आणि विलानोवामध्ये प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. आपल्याला प्रवेश मिळणार नाही हे माहित असूनदेखील केवळ नशीब आजमावून पाहाण्यासाठी त्यांनी प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. नंतर कॅलिफोर्नियातील हायवर्ड शहरातील एका महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. जीवनात प्राप्त केलेल्या यशासाठी ते याच महाविद्यालयाला श्रेय देतात.

02-Steven-Spielberg-200x129
‘ज्युरासिक पार्क’, ‘ब्रिज ऑफ स्पाइज’, ‘मायनॉरिटी रिपोर्ट’ आणि ‘वॉर ऑफ द वर्ल्ड’सारखे चित्रपट साकारणारे स्टिवन स्पिलबर्ग यांना युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅलिफोर्निया स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकायचे होते. दोनदा प्रयत्न करूनदेखील त्यांना इथे प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे ते कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी लाँग बीच इथे शिक्षण घेण्यासाठी गेले. चित्रपट मिळाल्यामुळे त्यांनी मध्येच शिक्षण सोडले. नंतर २००२ मध्ये याच विश्वविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली.

03-Sergey-Brin-200x129
गुगलचे सह-संस्थापक सर्जी ब्रिन यांना मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मध्ये प्रवेश घ्यायची इच्छा होती. परंतु, त्यांचा प्रवेश अर्ज निकालात काढण्यात आला. त्यानंतर त्यांनी स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीतून मास्टर डिग्री प्राप्त केली. इथेच त्यांची भेट लॅरी पेज यांच्याशी झाली आणि दोघांनी इंटरनेटचे विश्व पूर्णपणे बदलून टाकले.

04-Obama_AP-200x129
जगभरातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश होणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना स्वार्थमोर कॉलेजमध्ये शिकायची इच्छा होती. सीनेट ऑफिसमध्ये इंटर्नशिप करत असलेल्या याच कॉलेजमधील एका तरुणास ओबामा म्हणाले होते, अरे वा! स्वार्थमोर ग्रेट स्कूल. त्यांनी मला नाकारले होते. त्यावेळी माला खूप वाईट वाटले होते. अमेरिकेच्या पेन्सिल्व्हेनिया राज्यात स्वार्थमोर कॉलेज आहे. नंतर ओबामा ऑसिडेंटल कॉलेजमध्ये गेले आणि नंतर कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये ट्रान्सफर करून घेतली.

05-Matt-Groening-200x129
दी सिंप्सनचे निर्माता मॅट ग्रोनिंग यांचासुध्दा यात समावेश होतो. त्यांना हार्वर्डमधून नकार मिळाला होता. नंतर ऑलंपियामधील एका कॉलेजमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केले.

06-M_Id_402703_Warren_Buffett-200x129
वॉरेन बफे यांना हार्वर्ड बिजनेस स्कूलमध्ये प्रवेश मिळाला नाही. वॉल स्ट्रीट जर्नलबरोबरच्या मुलाखतीत ते म्हणाले होते, जीवनात माझ्याबरोबर जे काही घडले, त्यावेळी मला ते फार वाईट वाटले. परंतु नंतर ते खूप चांगले असल्याचे सिध्द झाले. जीवनात सहन करावी लागलेली हार ही काही काळासाठी असते, ती स्थायी स्वरुपाची नसते. शेवटाला तिचे अन्य एका संधीत रुपांतर होते, असे वॉरेन यांचे मानणे आहे.

07-John-Kerry_AP154-200x129
जॉन केरी हे अमेरिकेचे सध्याचे परराष्ट्र मंत्री आहेत. हार्वर्ड युनिव्हर्सिटीने प्रवेश नाकारलेल्या व्यक्तीमध्ये त्यांचीदेखील वर्णी लागते. तो अनुभव फारच लाजीरवाणा असल्याचे मनोगत एबीसीबरोबरच्या मुलाखतीत त्यांनी व्यक्त केले होते. येल युनिव्हर्सिटीतून पदवी प्राप्त केलेल्या केरींनी नंतर बोस्टन कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले.

008-Jerry-Greenfield-200x129
जेरी ग्रिनफिल्ड यांना मेडिकल कॉलेजात प्रवेश घ्यायची वेळ आली, तेव्हा सगळीकडून नकार आला. नंतर आपल्या शालेय मित्राला सोबत घेऊन त्यांनी आईस्क्रिमचा व्यवसाय सुरू केला. कालांतराने ‘बेन अॅण्ड जेरी’ कंपनीची स्थापना करणाऱ्या जेरी यांनी नंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. आज क्वचितच एखादा असा आईस्क्रिम प्रेमी आढळेल ज्याला ‘बेन अॅण्ड जेरी’ माहीत नाही.