मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात वादळी पावसामुळे नुकसान
- कोल्हापुरातील एलबीटी विरोधातील आंदोलन आजपासून मागे
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- स्थानिक संस्था कर जकातीशी समतुल्य उद्योगांना सवलती कायम
- विद्यार्थिनींच्या गाडीने सुटीत अर्थार्जनाची गोडी लावली
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
संसदेवरील हल्ल्याबद्दल दोषी ठरलेला दहशतवादी अफझल गुरु याला झालेली फाशीची शिक्षा अमलात आणू नये, त्याएैवजी त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, असे मत केंद्रीय पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी गुरुवारी व्यक्त केले. या वक्तव्याने त्यांनी कॉंग्रेसला गोंधळात टाकले. मात्र, तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे हे लक्षात येताच त्यांनी सारवासारव केली. असे वक्तव्य आपण केले नसून आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास बांधील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेसने वर्मा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे टाळले. पक्षाचे प्रवक्ते सत्यव्रत चतुर्वेदी म्हणाले," हे बेनी यांचे वैयक्तिक मत आहे. पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नाही. अफझल गुरुला फाशी देण्याबाबतच्या सरकारच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. अफझल गुरुच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी व्हायलाच हवी.
संसदेवरील हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांशी लढत शहीज झालेल्या सुरक्षा दलाच्या जवानांना एकीकडे श्रद्धांजली वाहिली जात असतानाच दुसरीकडे वर्मा यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्ष, शिवसेनेसह इतर विरोधी पक्षांनी सडकून टीका केली.




















हिवाळी अधिवेशन संपण्याची वाट पाहा.बहुतेक मंत्रीमंडळात बदलa ची शक्यता वर्तविली जाते.