पूर्वी प्रियकराने दगा दिल्यानंतर मुली रडत बसत. पण, आता चित्र संपूर्णपणे पालटले आहे. हल्लीच्या मुली प्रियकराने दगा दिल्यावर त्याला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसत नाहीत. जपानमधील एका महिलेने प्रियकराने दगा दिल्यावर त्याला धडा शिकवायचे ठरविले. तिच्या प्रियकराच्या सर्वात आवडत्या गोष्टी म्हणजे अॅपल कंपनीची महागडी उपकरणं. प्रियकराची अॅपल कंपनीची सर्व उपकरण तिने पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये टाकली. एवढ्यावरचं ती शांत बसली नाही तर त्या बाथटबचा फोटो काढून तिने प्रियकराला पाठवला. बाथटबमध्ये टाकलेल्या अॅपल उपकरणांचा फोटो ट्विटरवर व्हायरल झाला आहे.