पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली असून नीति आयोगाचे सदस्य विवेक देबरॉय यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या या ५ सदस्यीय आर्थिक सल्लागार परिषदेत प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे.

देबरॉय यांच्याशिवाय डॉ. सुरजित भल्ला, डॉ. रथिन रॉय आणि डॉ. आशिमा गोयल यांनाही अर्धवेळ सदस्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर नीति आयोगाचे सदस्य सचिव रतन वाटल यांना परिषदेचे प्रधान सल्लागार म्हणून नेमण्यात आले आहे.

आर्थिक सल्लागार परिषदेचे मुख्य कार्य हे पंतप्रधान यांना विविध आर्थिक प्रकरणांमध्ये सल्ला देणे हे असेल. परिषदेत पंतप्रधानांकडून सोपवण्यात आलेले आर्थिक किंवा अन्य संबंधित मुद्द्यांचे विश्लेषण करणे आणि सल्ला देणे, त्याचबरोबर महत्वाच्या आर्थिक मुद्द्यांचे समाधान करणे आणि त्याबाबत पंतप्रधानांना याची माहितीही ते देतील. त्याचबरोबर परिषदेकडून पंतप्रधान वेळोवेळी जी जबाबदारी देतील ती ही पार पाडावी लागणार आहे.