भौतिकशास्त्रातील प्रचलित सिद्धान्तांना आव्हान देणारे संशोधन साऊथ हॅम्पटन विद्यापीठातील ख्रिस्तोफर सॅचरदा यांनी केले आहे. काऑन नावाचे अणूच्या उपकरणांचे क्षरण होत असते असे वैज्ञानिकांचे मत आहे. त्यामुळे विश्वाच्या निर्मितीविषयी अधिक माहिती मिळू शकते. विश्वाच्या उत्पत्तीसंबंधीच्या महाविस्फोट सिद्धान्ताला त्यामुळे आव्हान मिळू शकते.
काऑन कणांबाबत सॅचरदा यांनी केलेल्या संशोधनात एक नवीन परिणाम दिसून आला असून, त्यामुळे काऑन कणांचे वर्तन जेव्हा द्रव्य व प्रतिद्रव्यात अदलाबदल होते तेव्हा कसे बदलते हे समजले आहे याला सीपी सिम्रिटी उल्लंघन असे नाव देण्यात आले आहे, त्याबाबत काही आकडेमोडही करण्यात आली आहे. जर यातील गणने प्रायोगिक निष्कर्षांशी जुळली नाहीत तर तो सीपी सिम्रिटी उल्लंघन परिणामाचा पुरावा असणार आहे.
आताचे अणूकण व उपकरण यांच्याविषयी भौतिकशास्त्रज्ञांनी प्रमाणित प्रारूप सिद्धान्त मांडला आहे त्याच्यापेक्षा वेगळा सीपी सिम्रिटी उल्लंघन सिद्धान्त आहे. अजून तरी सिद्धान्त व प्रयोग यात असा फरक आढळून आलेला नाही, पण वैज्ञानिकांच्या मते काटेकोर आकडेमोड केली तर हा फरक दिसून येईल व त्यामुळे सीपी सिम्रिटी उल्लंघन परिणामाचा सिद्धान्त खरा ठरेल. फिजिकल रिव्हय़ू लेटर्स या नियतकालिकात हा संशोधन निबंध प्रसिद्ध झाला आहे.