पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चार यूरोपीय देशांच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर प्रश्न उपस्थित करणारे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. मोदींनी विदेश यात्रेपूर्वी सुशील मोदी किंवा विरोधकांची परवानगी घेतली का, असा सवाल तेजस्वी यांनी सोमवारी विचारला होता. तेजस्वी यादव बऱ्याच वेळा आपले ट्विट हे हिंदीमध्ये करतात. परंतु या वेळी मात्र त्यांनी इंग्रजीमध्ये ट्विट केले. त्यामुळे सोशल मीडियावर लगेचच त्यांना तुम्ही इंग्रजी कुठून शकलात की तुमचं अकाऊंट कोणी दुसरं चालवतं असा खोचक सवाल एका व्यक्तीने विचारला.

दरम्यान, मोदी हे सोमवारी यूरोपीय देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. हा दौरा भारतासाठी खूप महत्वाचा आहे. दि. २९ मे ते ३ जूनपर्यंत मोदी हे जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रान्समध्ये विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

मोदींनी आपल्या ट्विटर हँडलवरून या दौऱ्याची माहिती दिली होती. त्यांचे हे ट्विट रिट्विट करत तेजस्वी यादव यांनी मोदींना प्रश्न विचारला की या दौऱ्यापूर्वी त्यांनी विरोध पक्ष किंवा सुशील मोदींची परवानगी घेतली का? कारण बिहार सरकारचे लोक अधिकृत दौऱ्यावर जातात तेव्हान त्यांचा मोठा आक्षेप असतो, असे त्यांनी पुढे म्हटले.