भाजपचा आरोप, चौकशीची मागणी; केंद्राकडून दखल

भाजपच्या दोन केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यावर बारगड येथे करण्यात आलेला हल्ला पोलिसांच्या उपस्थितीत आणि पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या सक्रिय सहभागाने करण्यात आल्याचा आरोप शनिवारी भाजपने केला. राज्यपाल एस. सी. जमीर यांनी या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावे, अशी मागणीही भाजपने केली आहे.

cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
AAP leader Atishi accused the central government of a conspiracy of President rule in Delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचा कट! ‘आप’च्या नेत्या आतिशी यांचा केंद्र सरकारवर आरोप; भाजपचे प्रत्युत्तर
janardhan reddy return to bjp
खाण घोटाळाप्रकरणी नऊ गुन्हे दाखल असलेल्या माजी मंत्र्याचा भाजपात प्रवेश; यामागचं राजकारण काय?
pankaja munde
मोले घातले लढाया: ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यां’ची रवानगी दिल्लीत !

ओदिशातील सत्तारूढ बीजेडीला हे मंत्री राज्य अतिथी असल्याची जाणीव होती त्यामुळे त्यांनी हा कट रचला, असे भाजपने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. केंद्रीय मंत्री संतोष गंगवार, साध्वी निरंजन ज्योती आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्या ताफ्यावर बीजेडीच्या समर्थकांनी बारगड येथे हल्ला केला होता.

ही टोकाची असहिष्णुता असून ओदिशातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे द्योतक आहे, असेही भाजपने म्हटले आहे. ओदिशाचे मंत्री स्नेहांगिनी छुरिया यांच्यासह स्थानिक खासदार आणि आमदारांनी केलेला हा नियोजनपूर्ण हल्ला आहे, असेही भाजपने निवेदनात म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

ओदिशात केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या केंद्रीय नेत्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी सूचना गृहमंत्र्यांनी राज्यपाल जमीर आणि मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून केली आहे. या प्रकाराची दखल घेऊन भविष्यात त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असे राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.