केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या मातोश्री रजनी जावडेकर यांचे दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात हृदयविकारामुळे निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. रजनी जावडेकर या पुणे आणि रायगडमधील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षिका होत्या. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी २ ते ४ दरम्यान ६ कुशक रोड येथे ठेवण्यात येईल. यानंतर संध्याकाळी ५ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.