भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांची राष्ट्रवादाबाबत जी मते होती त्याचा आधार या विषयावरील प्रचारासाठी घेण्याचे आता भाजपने ठरविले आहे. डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे १४ एप्रिलपासून तीन दिवस देशभरात पंचायत पातळ्यांवर जयंती साजरी करण्यासाठी मोठी योजना आखली आहे.

डॉ. आंबेडकरांच्या जयंतीदिनापासून कार्यक्रमांची मालिका तयार करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घटनाकारांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे त्यावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. पक्षाच्या सर्व खासदार, आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना त्यासाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.

Contempt of Babasaheb Ambedkar by Congress Amit Shah allegation
काँग्रेसकडून बाबासाहेबांचा अवमान; अमित शहा यांचा आरोप
Dr. Babasaheb Ambedkar and Kalaram Mandir Satyagraha
काळाराम मंदिर सत्याग्रह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर झालेली दगडफेक, १९३० मध्ये ‘त्या’ दिवशी नेमके काय घडले होते?
Andhasraddha Nirmulan Samiti
अर्ज भरण्यासाठी मुहूर्त पाहणाऱ्या उमेदवारांमुळे अंधश्रद्धेला खतपाणी – अंनिसचा आक्षेप
Hindu Code Bill and Dr Babasaheb Ambedkar Marathi News
Hindu Code Bill: बाबासाहेबांचा राजीनामा; पंडित जवाहरलाल यांची भूमिका नक्की काय घडले होते?

उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार असून दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने हा कार्यक्रम हाती घेतला आहे.

देशाच्या ऐक्याबाबत डॉ. आंबेडकरांचे विचार काय होते त्यावर आम्ही प्रकाशझोत टाकणार आहोत, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.