काळा पैसा जागतिक शांतता व सौहार्द धोक्यात आणेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. लोकशाही व्यवस्था असलेल्या देशांनी एकत्रितपणे काळ्या पैशाविरोधात एकजुटीने उभे राहाण्याचे आवाहन त्यांनी केले.
परदेश दौऱ्यावरून परतल्यावर मोदींनी ब्लॉगवर ‘जी २०’ परिषदेत भारताने जागतिक समुदायापुढे काळ्या पैशाचा धोका पुढे आणल्याचे स्पष्ट केले आहे. या विषयावर गंभीरपणे विचार सुरू झाला ही समाधानाची बाब आहे. काळ्या पैशामुळे दहशतवाद, अमली पदार्थ यांचा व्यापार होऊ शकतो. त्यासाठी जागतिक समुदायाकडून एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.