ब्रिटिश सरकारने १८ मार्चपासून सर्व प्रवर्गाच्या व्हिसा शुल्कात सरसकट वाढ करण्याचे ठरवले आहे, त्यामुळे भारतातून ब्रिटनमध्ये जाणाऱ्या हजारो कौशल्यक्षम कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.

जानेवारीत ही शुल्कवाढ प्रस्तावित केली असून त्यात अल्प मुदतीच्या भेटीसाठीचा व्हिसा, विद्यार्थी व्हिसा यात दोन टक्के शुल्कवाढ करण्यात येणार आहे. तर, राष्ट्रीयत्व व स्थायिक व्हिसा शुल्कात २५ टक्के वाढ करण्यात येणार आहे. ब्रिटनच्या गृह खात्याने म्हटले आहे की, स्थलांतरित, नागरिकत्व प्राप्ती यात ब्रिटनमधील करदात्यांवरचे ओझे कमी करण्यासाठी ही शुल्कवाढ करण्यात येत आहे. २०१५ मध्ये ५२,३६० भारतीय स्थलांतरितांना  व्हिसा मंजूर केला होता. आता त्याची मुदतवाढ करताना सुद्धा जास्त शुल्क आकारले जाणार आहे.