नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतची जी कागदपत्रे ब्रिटनच्या ताब्यात आहेत ती खुली करण्याबाबत ब्रिटनने आणखी काही काळ मुदत मागितली आहे असे बोस यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. बोस यांच्या कुटुंबीयांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून १९४५ मध्ये नेताजी अचानक बेपत्ता झाल्याबाबतच्या फाईल्स खुल्या करण्याची मागणी केली होती.

नेताज यांचे नातेवाईक सूर्यकुमार बोस यांनी सांगितले की, आपली बहीण माधुरी बोस यांनी ब्रिटिश सरकारकडे याबाबत मागणी केली होती व त्यांना त्याबाबत प्रतिसादही मिळाला असून या फाईल्स खुल्या करण्यास वेळ लागेल असे कळवण्यात आले आहे. सूर्यकुमार यांनी बर्लिन येथे एप्रिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यांनी सांगितले की, आम्ही, अमेरिका, रशिया व जपान या देशांकडेही नेताजींबाबतची कागदपत्रे मागितली आहेत.