इराक व सीरियामधील जमिनीचे पट्टे बळकावणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटात सहभागी होऊन त्यांच्यासोबत लढण्यासाठी इस्लामिक स्टेटशी संबंध असणारे ब्रिटनमधील दहशतवादी तेथील किशोरवयीन मुलांना रोख रक्कम देत आहेत.
‘दी टाइम्स’ नियतकालिकाने त्यांच्या दोन वार्ताहरांना शालेय विद्यार्थिनी असल्याचे भासवून तीन महिने गुप्त मोहीम राबवली. यात त्यांना अगदी १७ वर्षे इतक्या तरुण वयाच्या ब्रिटिश मुसलमानांना विदेशात लढण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या व भरती करणारा एक सेल कार्यरत असल्याचा पुरावा हाती लागला.
‘टाइम्स’च्या एका चमूने पूर्व लंडनमधील १७ वर्षे वयाच्या एका मुलीला दहशतवादी प्रचारामध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरवण्यात आले व त्यानंतर स्वत:चे नाव अबू अब्बास अल्-लुबनानी असे सांगणाऱ्या कट्टर जिहादीशी ट्विटरमार्फत तिचा संपर्क साधून देण्यात आला. ‘आयशा’ नाव घेतलेल्या या मुलीने पळून इस्लामिक स्टेटच्या भूप्रदेशात जाण्यात रस दाखवला, तेव्हा अबूने तिला ब्रिटनमधील मध्यस्थामार्फत रोख रक्कम देण्याची तयारी दाखवली.
मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यांसारख्या कंपन्यांनी गेल्या आठवडय़ात मुलांच्या ऑनलाइन लैंगिक शोषणाविरुद्धच्या लढय़ात पुढाकार घेऊन भूमिका बजावल्याबद्दल ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी त्यांचे अभिनंदन केले होते, तसेच इंटरनेटवरील दहशतवादी कारवाया ओळखून व त्यांच्यावर देखरेख करून त्यांची माहिती देण्याचे आवाहन केले होते.