पश्चिम बंगालमध्ये बुर्दवान येथे महिनाभरापूर्वी झालेल्या स्फोटात दोन अतिरेकी ठार झाल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एनआयए या घटनेचा तपास करीत असून त्यात कुठलीही प्रगती झालेली नाही.
यातील काही आरोपी पळून गेले असून त्यांचा छडा लावता आलेला नाही. बुर्दवान जिल्ह्य़ात खग्रागड येथे एका घरात दोन ऑक्टोबरला हा स्फोट झाला होता. त्यातील अनेक आरोपी अजून बेपत्ता आहेत. जमात उल मुजाहिद्दीन या बांगलादेशी संघटनेच्या अतिरेक्यांचा त्यात हात असल्याचा संशय आहे. या मुद्दय़ावरून राजकीय वातावरणही तापले आहे.    यातील मुख्य आरोपी साजीद हा पश्चिम बंगाल पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे.