• गेल्या वर्षी जुलैत हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी हा चमकीत मारला गेला. त्यानंतर सबझार अहमद बट याने या संघटनेच्या प्रमुखपदाची जबाबदारी घेतली. त्याचे नाव ‘सब डॉन’ असेही होते. आज तो त्राल येथे चकमकीत मारला गेला. त्याच्या संघटनेच्या समूहाने टाकलेल्या व्हिडिओ व छायाचित्रात तो अनेक ठिकाणी दिसला होता.
  • बट हा काश्मीरमधील ए ++ दर्जाचा दहशतवादी होता व त्रालमध्ये लोकप्रिय होता. त्याने प्रमुखपद घेतल्याची घोषणा हिज्बुलने कधीच केली नव्हती. काहींच्या मते सबझार हा लगेच प्रमुख झाला नव्हता, तर पंधरा दिवसांपूर्वी झाकीर रशीद म्हणजे झाकीर मुसाने पद सोडल्यानंतर तो प्रमुख बनला होता.
  • बट हा दक्षिण काश्मीरमधील त्रालचा रहिवासी होता. बुरहान वानी याचा उजवा हात म्हणून तो ओळखला जात असे. दोन वर्षे वानी याच्याबरोबर त्याने काम केले होते. हिज्बुलच्या अनेकांशी त्याचा संपर्क होता.
  • बट याचे एका मुलीवर प्रेम होते, पण तिच्या कुटुंबाने त्याला नाकारले तेव्हा नाते तुटल्याने तो दहशतवादाकडे वळला.
  • तो बालपणापासून बुरहान वानी याचा मित्र होता व बुरहान वानीचा भाऊ खालीद मारला गेला तेव्हा बटने लष्करी जवानाकडून रायफल हिसकावली होती. तेव्हापासून तो हिज्बुलमध्ये नावारूपास आला.
  • बट याने एक छायाचित्र टाकले होते त्यात तो बुरहान वानी व इतर अकरा जणांसमवेत दिसत होता.
  • हिज्बुलच्या दहशतवादी मोहिमात सबझार आघाडीवर होता व झाकिर मुसा याने त्याची तांत्रिक विभागाचा प्रमुख म्हणून नेमणूक केली होती.
  • बट याच्या नावाने १० लाखांचे इनाम होते, त्याचे दहशतवादी प्रशिक्षण भारतातच झाले होते.
  • बट हा त्राल येथे मार्च २०१७ मध्ये सुरक्षा दलांच्या गोळीबारात सापडला होता, पण रात्रीच्या अंधारात पळून गेला.
  • पंच, सरपंच, सुरक्षा दले यांच्यावर तो हल्ला करीत असे. सबझार याने अनेक नागरिकांना मारले होते, जे लष्कराचे खबरे होते.
  • काश्मीरच्या विभाजनवादी चळवळीच्या उद्देशावरून झाकीर मुसा याने हुर्रियतच्या नेत्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती; तेव्हा त्यांच्यात समझोता घडवण्यासाठी सबझार बट हा १९ व २० मे रोजी श्रीनगरला आला होता.