बद्रीनाथहून ऋषिकेशला येत असताना भाविकांच्या एका बसला भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये महाराष्ट्रातले भाविक होते, अचानक बस दरीत कोसळली आणि हा अपघात झाा ज्यामध्ये दोन भाविकांचा मृत्यू झाला असून इतर भाविक जखमी झाले आहेत. ठकुबाई साबळे आणि भागुबाई साबळे या दोन महिलांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. तर जखमी रूग्णांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं सोडवून रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघात झालेल्या तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातं आहे आणि त्यांना उपचारासाठी देहरादूनमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

अपघातग्रस्त बसमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यात असलेल्या निधोणा या गावातले ३५ प्रवासी बसले होते. मात्र ही बस केदारनाथजवळच्या दरीत कोसळली आणि हा अपघात झाला. जखमी प्रवाशांवर सध्याच्या घडीला केदारनाथ आणि जवळच्या रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. अपघाताची तीव्रता लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याचीही चिन्हं आहेत. तर ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे मदत आणि बचावकार्यही सुरू करण्यात आलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी महाराष्ट्रातल्या भाविकांना घेऊन एक बस बद्रीनाथहून केदारनाथला येत होती.

ही बस कर्णप्रयाग भागात आली असता चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि ही बस दरीत कोसळली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात एका महिलेसह दोनजणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात जे गंभीर जखमी आहेत त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं देहरादूनमध्ये हलवण्यात आलं आहे. ही बस एका रोलिंगला टक्कर देऊन दोन घरांच्या मधे अडकली होती अशी माहिती चमोलीच्या एसपी तृप्ती भट यांनी दिली आहे. आता या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर उपचार सुरू आहेत.

 

 

 

केदारनाथला दर्शनासाठी गेलेल्या औरंगाबादमधील भाविकांची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात. दोन भाविकांचा मृत्यू झाला. तर 33 जण जखमी आहेत. ठाकूबाई साबळे आणि भागूबाई साबळे या दोन भाविक महिलांचा मृत्यू झाला.अपघाताची तीव्रता लक्षात घेता मृतांची संख्या वाढण्याची श्यक्यता आहे. बद्रीनाथहून ऋषिकेशला येत असताना चालकाचा नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील निधोना गावातील 28 आणि पाडळीमधील 7 असे 35 यात्रेकरू खाजगी बसने केदारनाथला गेले होते. उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातील कणप्रयागमध्ये हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच  एसडीआरएफ आणि पोलिसांच्या पथकही घटनास्थळी दाखल झाले. तसेच स्थानिकांनी बचावकार्यात मदत केली.जखमीवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत असून गंभीर जखमींना विमानाने देहरादूनला नेण्यात आलं आहे.