केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून ज्या निर्णयाची सर्वजण वाट पाहात होते. तो क्षण अखेर आला असून,7 pay commission सातव्या वेतन आयोगाने केलेल्या वेतनवाढीच्या शिफारशींना केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे. एक जानेवारी २०१६ पासून वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी होणार आहे.


सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर निर्णय घेण्यासाठी सरकारने जानेवारी महिन्यांत कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा लाभ केंद्र सरकारचे ४७ लाख कर्मचारी आणि ५२ लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे.
वाचा : सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशी कोणत्या…
सातव्या वेतन आयोगाने नोव्हेंबर महिन्यांत आपला अहवाल सादर केला असून, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि निवृत्तीवेतनात एकूण २३.६ टक्के वाढ करण्याची शिफारस केली.

व्हिडिओ- सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंत्रिमंडळाची मंजुरी