दिल्लीतील सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना दिल्लीतील द्वारका परिसरात सदनिका देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी होणाऱया बैठकीत घेण्यात येण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय घेण्यात येईल.
भवनामध्ये पीडितेच्या कुटुंबियांना सदनिका देण्याचे सरकारने अगोदर ठरविले होते. मात्र, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीच्यावेळी पीडितेच्या कुटुंबियांनी दिल्लीजवळ सदनिका देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर द्वारकामध्ये असलेली सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला. या क्रूर प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा देण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील, असेही आश्वासन सोनिया गांधी यांनी तिच्या कुटुंबियांना दिले होते.
गेल्या वर्षी १६ डिसेंबर रोजी चालत्या बसमध्ये सहा जणांनी पीडितेवर अमानुष शारीरिक अत्याचार करीत बलात्कार केला होता. संबंधित मुलीवर उपचार सुरू असताना सिंगापूरमध्ये तिचा मृत्यू झाला होता.