मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- ययाति आणि देवयानी
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
देशातील भ्रष्टाचार संपविण्याची यूपीएची इच्छाच नाही. त्यामुळे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर आता विश्वास ठेवता येणार नाही. या शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी कॅबिनेटने आज मंजूर केलेल्या सुधारित लोकपाल विधेयकाला विरोध केला.
भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कठोर लोकपाल विधेयक आणावे, यासाठी यापुढे डॉ. सिंग आणि सोनिया गांधी यांच्यावर विसंबून राहून चालणार नाही. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही, असा आरोप हजारेंनी केला. कॅबिनेटने मंजूर केलेले सुधारित लोकपाल विधेयक हा केवळ एक फार्स आहे. भारतीय नागरिकांना मूर्ख बनवले जाते आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात मी सीबीआय आणि सीव्हीसी केंद्र सरकारच्या नियंत्रणाबाहेर ठेवणार का, असा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, त्यांनी सोयिस्करपणे त्या प्रश्नावर उत्तर देण्याचे टाळले, असे सांगत सरकारने कमकुवत विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला आम्ही आणखी जोरदार विरोध करू, असा इशाराही हजारे यांनी दिला.




















गांधी मैदानावरच्या अण्णांच्या आंदोलनाला कोणत्याही माध्यमाने प्रसिद्धी द्यायची नाही असे ठरवले आहे. लोकसत्ता सारखा पेपर पण पुचकळ बातम्या छापण्यात पटाईत आहे. देशभर मेणबत्ती घेऊन शांततापूर्ण आंदोलन करणार्यांना “मेणबत्ती संप्रदाय” म्हणून हिणवणारे गिरीश कुबेर महात्मा गांधींना पण “प्रभात फेरिकार” म्हणाले असते आणि त्यावेळेच्या सत्याग्रहींना “प्रभात फेरी संप्रदाय”. कोणतीही कृती केली कि त्यावर टीका करायची आणि पक्षपाती होत आंदोलनच्या बातम्या पण छापायच्या नाहीत. गर्दी कमी झाल्यावर दहादा कमी गर्दीच्या बातम्या द्यायच्या. कोन्ग्रेसचे चहेते आहेत सर्व “बुद्धिवादी संपादक संप्रदाय”.