टूजी घोटाळ्यातील सरकारी वकील ए. के. सिंग आणि युनिटेकचे व्यवस्थापकीय संचालक संजय चंद्र यांच्यात झालेल्या संभाषणाच्या ध्वनिफितीसंदर्भात चौकशी करण्यासाठी सीबीआयने बुधवारी या घोटाळ्यातील आरोपी शाहीद बलवा यांना चौकशीसाठी बोलाविले.
ध्वनिफितीमधील संभाषणात बलवा यांचे नाव आल्याने त्यांना तपासासाठी बोलाविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दूरसंचार क्षेत्रातील वैमनस्यामुळे संभाषणाची ध्वनिफीत उघड झाली असल्याने बलवा यांच्या चौकशीतून अधिक माहिती बाहेर येण्याची सीबीआयला अपेक्षा आहे.
दरम्यान, सीबीआयला केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून या आधीच्या सीडीबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये ए. के. सिंग आणि चंद्र यांच्यातील संभाषण होते. ते संभाषण सुस्थितीत आहे.
 तथापि, सिंग आणि चंद्र यांच्या आवाजाचे नमुने नसल्याने त्यामधील आवाज या दोघांचेच आहेत का, याची निश्चिती होऊ शकली नाही.