कोटय़वधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी यांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी चौकशी केली. नलिनी या सर्वोच्च न्यायालयात वकिली करत आहेत. शारदा समूहाने नलिनी यांना दिलेल्या रकमेसंबंधी ही चौकशी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.