सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावरून सातत्याने वाद निर्माण होत असताना माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी सेन्सॉर बोर्ड ही स्वायत्त संस्था असून ती सरकारचे मुखपत्र नाही, असे सांगत केंद्राची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
जेम्स बॉण्डच्या ‘स्पेक्टर’ सिनेमातील चुंबनदृश्यांबाबत स्पष्टीकरण देण्यात सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख पहलज निहालानी अपयशी ठरल्यावर राठोड यांनी हे वक्तव्य केले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राठोड बोलत होते.