प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांच्यावर कारवाई करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला केली आहे. तोगडिया यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांच्या तपास करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी केली.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱयाने सांगितले की, तोगडियांच्या प्रक्षोभक भाषणांचा तपास करावा आणि त्यामध्ये तथ्य आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना करण्यात आली आहे.
तोगडिया यांच्याविरुद्ध कायदेशीर पावले उचलली जातील, असे राज्य सरकारने म्हटले आहे. दरम्यान, यासंदर्भात बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री आर. पी. एन. सिंग म्हणाले, तोगडियांचे वक्तव्य प्रक्षोभक आहे आणि त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.