देशातील सर्वात मोठी बँक असा लौकिक असलेल्या एसबीआयने (SBI) आपल्या सहकारी बँकांच्या ग्राहकांना नव्या चेकबुकसाठी अर्ज करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.  ३० सप्टेंबरपासून आधीचे चेक आणि आयएफएस कोड अवैध मानला जाईल असेही बँकेने स्पष्ट केले आहे.एसबीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या संबंधीचा एक व्हिडिओही ट्विट केला आहे.

‘स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर’, ‘स्टेट बँक ऑफ हैदराबाद’, ‘स्टेट बँक ऑफ म्हैसूर’, ‘स्टेट बँक ऑफ पटियाला’, ‘स्टेट बँक ऑफ त्रावणकोर’ आणि ‘भारतीय महिला बँक’ या बँकांचे विलीनकरण एसबीआयमध्ये करण्यात आले आहे. या सहाही बँकांचे आधीचे चेकबुक बंद होणार आहेत. या बँकांमध्ये खाती असणाऱ्या सगळ्या ग्राहकांनी लवकरात लवकर नव्या चेकबुकसाठी अर्ज करावा अशी सूचना एसबीआयने केली आहे. नव्या चेकबुकसाठी ग्राहकांनी थेट बँकेत अर्ज करावा किंवा इंटरनेट बँकिंग, एटीएम किंवा मोबाईल बँकिंगचा आधार घेऊन अर्ज करावा असेही एसबीआयने स्पष्ट केले आहे.