बिकानेर येथे एका नराधम बापाने पोटच्या मुलीला चावे घेतले. त्यानंतर सरकारी रुग्णालयात उपचार करीत असताना तिचा मृत्यू झाला. ही मुलगी अवघी पाच महिन्यांची होती. या क्रूरकर्मा बापाने तिचे ओठ, नाक, गाल या भागांना चावे घेतले.
सवाई मानसिंग सरकारी रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, या मुलीची प्रकृती तिच्या आईने तिला स्तनपान दिल्यानंतर ढासळली होती. आईचे दूध थेट तिच्या फुफ्फुसात गेले त्यानंतर आणखी गुंतागुंत झाली. नंतर तिला कृत्रिम श्वास यंत्रणेवर ठेवण्यात आले पण तरीही तिचे प्राण वाचू शकले नाहीत. या मुलीवर १ फेब्रुवारीला शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. या मुलीचा बाप बहादूर सिंग (३६) याच्यावर खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. सियाना खेडय़ात राहणारा बहादूरदारू पिऊन घरी आला. त्याने पत्नी संतोष हिच्याशी भांडण केले, त्यातच त्याने रागाच्या भरात मुलीला चावे घेतले.
बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष दीपक कालरा यांनी सांगितले की, ही अतिशय दु:खद गोष्ट आहे.