दहशतवाद्याच्या मुद्यावरुन अमेरिकेचे अध्यक्ष डोलान्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचा समाचार घेतल्यावर आता चीन पाकिस्तानच्या मदतीला धावला आहे. पाकिस्तान दहशतवादविरोधी लढ्यात कायमच अग्रेसर राहिला आहे, अशा शब्दांमध्ये चीनने मित्र राष्ट्राची पाठराखण केली आहे. पाकिस्तानने यापुढे दहशतवाद्यांना थारा दिल्यास अमेरिका शांत बसणार नाही, असा इशारा ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिला होता. यानंतर आता चीन पाकिस्तानच्या मदतीला धावून आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत बोलताना पाकिस्तानातील दहशतवादावर कठोर शब्दांमध्ये अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानवर ट्रम्प यांनी ताशेरे ओढले. दहशतवादी संघटनांसाठी पाकिस्तान अशाच प्रकारे सुरक्षित आसरा ठरत राहिल्यास अमेरिकेला शांत बसता येणार नाही, असे त्यांनी म्हटले. ‘पाकिस्तानने आता दहशतवादाच्या विरोधात लढा देण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी करायला हवी. पाकिस्तानी जनताही दहशतवादामुळे होरपळत आहे. मात्र, तरीही पाकिस्तानकडून दहशवाद्यांना आश्रय देण्याचा उद्योग सुरू आहे, असे त्यांनी म्हटले.

Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
rajnath singh on pakistan
‘घरात घुसून मारू’, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पाकिस्तानचा जळफळाट
PNS Siddique naval base under attack
चीनची गुंतवणूक असलेल्या पाकिस्तानच्या हवाई तळावर हल्ला; या आठवड्यातली दुसरी घटना
Who are Majeed Brigade
माजीद ब्रिगेड कोण आहे? पाकिस्तानातल्या ग्वादर बंदरावर का केलं आक्रमण?

ट्रम्प यांच्या टीकेनंतर चीन मित्र राष्ट्र पाकिस्तानच्या बचावासाठी धावला. ‘अमेरिकेच्या धोरणांमुळे आशिया खंडात सुरक्षा, स्थैर्य निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे,’ अशा शब्दांमध्ये चीनने ट्रम्प यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली. ‘पाकिस्तान कायमच दहशतवादविरोधी लढाईत अग्रेसर राहिला आहे. पाकिस्तानने कायमच दहशतवाद्यांविरोधात लढा देताना अनेक गोष्टींचा त्याग केला आहे. आशिया खंडात शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्यात पाकिस्तानचे मोठे योगदान आहे,’ असे चीनच्या परराष्ट्र विभागाचे हुआ चुनयिंग यांनी म्हटले.