चीनकडून भारतीय सीमेवरील संरक्षण सज्जता आणि लष्करी बळात मोठ्याप्रमाणावर वाढ करण्यात आल्याचे पेंटागॉनने म्हटले आहे. जगभरात ज्याठिकाणी चीनी लष्कराचे तळ आहेत त्याठिकाणी सैन्याच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यत्वेकरून चीनी सैन्याच्या पाकिस्तानमधील लष्करी तळाचा समावेश आहे. चीनच्या लष्करी आणि संरक्षण बाबींविषयी अमेरिकन काँग्रेसपुढे सादर करण्यात आलेल्या वार्षिक अहवालात याबद्दलचा उल्लेख आहे.
‘आता पाकिस्तानला आवरण्याची वेळ’ 
अमेरिकेच्या पूर्व आशियाई संरक्षण विभागाचे उप सहाय्यक सचिव अब्राहम डेन्मार्क यांच्या माहितीनुसार, भारताच्या सीमेनजीक चीनकडून संरक्षण व्यवस्था आणि लष्करी संख्येत लक्षणीय प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मात्र, यामागील चीनचा नेमका हेतू अद्यापही समजला नसल्याचे अब्राहम यांनी म्हटले. याशिवाय, चीनकडून तिबेटमधील लष्करी व्यवस्थेत करण्यात येणाऱ्या बदलांविषयी विचारण्यात आले असता, या लष्करी हालचाली अंतर्गत स्थैर्यासाठी किंवा अन्य कोणत्या कारणासाठी करण्यात येत आहे, हे सांगणे कठीण असल्याचे अब्राहम यांनी सांगितले. यावेळी अब्राहम यांनी अमेरिकेच संरक्षणमंत्री अॅश्टन कार्टर यांच्या भारत दौऱ्याचाही उल्लेख केला. ही भेट दोन्ही देशांसाठी खूप सकारात्मक आणि फलदायी ठरल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही भारताबरोबरचे संबंध आणखी सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावर दिवसेंदिवस भारताचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळेच आम्ही त्यांच्याशी संबंध वाढवत असल्याचे अब्राहम यांनी म्हटले.
एफ १६ विमानांसाठी पाकिस्तानला बाजारभावाने पैसे मोजावे लागणार 

pakistan stock market returns
शेअर बाजार भांडवल ४५७४ अब्ज डॉलर वि. ३३ अब्ज डॉलर… तरीही पाकिस्तानी शेअर बाजाराकडून सेन्सेक्सपेक्षा जास्त परतावा कसा?
international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
apec climate center predict india will receive above normal monsoon rainfall
विश्लेषण : ला-निनामुळे यंदाच्या पावसाळयात ‘आबादाणी’ होईल?
International Monetary Fund
विकास दराचे आठ टक्क्यांचे सातत्य २०४७ पर्यंत टिकेल; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालक सुब्रमणियन यांचा दावा