योगगुरू रामदेव बाबा यांनी पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत विक्री होत असलेल्या चिनी उत्पादनांविरोधात आवाज उठवला आहे. चीनने भारतीय बाजारपेठेतून आता गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे, असे सांगत रामदेव बाबांनी देशातील लोकांना चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. जर सर्व भारतीयांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकला तर चीनला आपल्यापुढे नाक घासावे लागेल, असे रामदेव बाबांनी म्हटले. यापूर्वीही रामदेव बाबा यांनी चीनवर अशाप्रकारची टीका केली होती. भारतात चिनी वस्तूंची विक्री करून चीन बक्कळ पैसा कमावते आणि पाकिस्तानला मदत करते, असे रामदेव बाबा यांनी म्हटले होते. गेल्या आर्थिक वर्षात चीनने भारतात ५८.३३ अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती. मात्र, दुसरीकडे भारत आणि चीन यांच्या व्यापारात ११.७६ कोटींची घट झाली होती. भारतातील बहुतांश औषध कंपन्यांना लागणार कच्चा माल चीनमधून आयात केला जातो.

सध्या सिक्कीम व भोपाळ परिसरात असणाऱ्या डोक्लाम सीमाभागात भारत आणि चीन एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. चीनने यावरून अनेकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे. देशाचे सार्वभौमत्व अखंड ठेवण्यासाठी कितीही मोठी किंमत मोजायला तयार आहोत, अशा शब्दांमध्ये चीनने पुन्हा एकदा भारताला इशारा दिला होता. चीन स्वत:च्या सुरक्षेसाठी कितीही मोठी किंमत मोजायला तयार आहे. देशाच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत, असे चिनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वु क्यान यांनी म्हटले होते.

पतंजलीचे साम्राज्य खालसा करण्यासाठी दिग्गज कंपन्यांचा ‘स्पेशल प्लान’