जगात विजेवर चालणाऱ्या पहिल्या विमानाची निर्मिती चीनने केली असून त्याला हवाई उड्डाण सक्षमतेचे प्रमाणपत्र मिळाले आहे. बीएक्स १ इ असे या विमानाचे नाव असून त्याचे पंख १४.५ मीटर लांब आहेत तर त्यातून २३० किलो वजन वाहून नेता येते. हे विमान तीन हजार मीटर उंचीवरून उडते. दोन तासांत विमानाचे चार्जिग होते व नंतर ते ४५ मिनिटे ते १ तास उडू शकते, या विमानाचा ताशी वेग १६० कि.मी. आहे असे ‘शिनहुआ’ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
शेनयांग एरोस्पेस युनिव्हर्सिटी व लायोनिंग जनरल अ‍ॅव्हिएशन अ‍ॅकॅडमी यांनी हे विमान तयार केले आहे. पहिली दोन विमाने लायोनिंग रूक्सीयांग जनरल अ‍ॅव्हिएशन लि या कंपनीला विकण्यात आली आहेत. वैमानिक प्रशिक्षण, पर्यटन, हवामानशास्त्र व मदतकार्य या क्षेत्रात या विमानाचा उपयोग होऊ शकतो. या विमानाची किंमत १० लाख युआन म्हणजे १,६३,००० डॉलर्स आहे. आतापर्यंत अशा २८ विमानांची मागणी नोंदण्यात आली आहे.

Share Market
Stock Market Opening Bell : मतदानाच्या पहिल्या टप्प्यात शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स-निफ्टीची नकारात्मक सुरुवात
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
blow to airline
रद्द केलेल्या तिकिटाची वाढीव दराने विक्री प्रकरणी विमान कंपनीला दणका, भरपाईपोटी ५० हजार रुपये देण्याचा आदेश