भारतातील अति-अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी सुमारे ३,६०० कोटींच्या हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारातील फिनमेसेनिया कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जीयुसेपी ओर्सी व ऑगस्टावेस्टलॅण्ड कंपनीचे माजी प्रमुख ब्रुनो स्पाग्नोलिनी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांतून गुरुवारी दोषमुक्त करण्यात आले परंतु बनावट खर्चाशी संबंधित बनावट कागदपत्रे केल्याच्या आरोपांखाली या दोघांना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
भारतातील अति-अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना १२ हेलिकॉप्टरची विक्री करण्याच्या व्यवहारात आंतरराष्ट्रीय स्तरावर भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांतून या दोघांना मुक्त करण्यात आले आहे परंतु बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या आरोपाखाली त्यांना शिक्षा झाल्याचे वृत्त ‘आन्सा’ या इटालियन वृत्तसंस्थेने दिले आहे.